Home संस्कृती मारवाडी युवा मंचच्या वतीने प्रख्यात गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांच्या पहाट गाणी कार्यक्रमाचे...

मारवाडी युवा मंचच्या वतीने प्रख्यात गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांच्या पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन

640
0

परळी । पहाटगाणी हा दिवाळी परंपरेचा अविभाज्य घटक आहे. गेल्या 21 वर्षांपासून मारवाडी युवा मंचच्या वतीने पहाटगाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटगाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि.14 नोव्हेंबर रोजी ऑर्केस्ट्रॉ स्वरमिलाप प्रस्तुत पहाटगाणी कार्यक्रम होणार आहे. पहाटे 5.00 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे प्रसिध्द गायीका स्वरलक्ष्मी लहाने आणि संघ यांच्या सुमधूर आवाजात हा कार्यक्रम  सादर होईल. मराठवाडा साथी पीसीएन न्युज, मराठवाडा साथी टिव्ही आणि दै.मराठवाडा साथीच्या फेसबुक पेजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

पहाटगाणी म्हणजेच दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला गीत संगीताची मेजवानी आणि आपल्यापैकीच अनेकांच्या आवाजातील अविट गोडीच्या गाण्याची एक संगीत मैफलच… या कार्यक्रमात हिंदी, मराठी भावगीत व भक्तीगीतांचे सादरीकरण होते आणि दिवाळीची पहाट अगदी मंगलमय होऊन जाते. गेल्या 21 वर्षांपासून मारवाडी युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे अखंडपणे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाचा काळ जरी असला तरी आपल्या सणासुदीचा उत्साह कमी होऊ नये यासाठी ही परंपरा पुढेही चालू ठेवण्याचा मारवाडी युवा मंचच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. सुप्रसिध्द गायीका स्वरलक्ष्मी लहाने यांच्या सुमधूर आवाजात यंदाचा पहाटगाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे. लहाने यांनी राष्ट्रीय तथा अंतरराष्ट्रीय स्तरावर गायनातील अनेक पुरस्कार प्रप्त केलेले आहेत.त्यांच्याच आवाजाची जादू आणि नजाकत परळीकरांना आणि सबंध महाराष्ट्रातील जनतेला ऐकायला मिळणार आहे. शनिवारी होणाऱ्या मारवाडी युवा मंचच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव जयपाल लाहोटी, कार्याध्यक्ष विजय वाकेकर यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here