Home मनोरंजन ‘लिटिल चॅम्प’ कार्तिकीचे झाले ‘लग्न’…!

‘लिटिल चॅम्प’ कार्तिकीचे झाले ‘लग्न’…!

270
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ‘सारेगमप लिट्ल चॅम्पस’ ची विजेती व लाईव्ह शो करणारी कार्तिकी गायकवाड हिचे नुकतेच व्यावसायिक रोनित पिसेशी लग्न पार पडले. कार्तिकीची मैत्रिण आर्या आंबेकर हिने इन्स्टाग्रामवर विवाह सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.

दरम्यान,कार्तिकी आणि तिचे वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लग्नाचे निमंत्रण दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here