Home महाराष्ट्र मुंबईला केले जातेय का दहशतवादाकडून लक्ष ? ताजला उडवण्याच्या धमकीचे फोन

मुंबईला केले जातेय का दहशतवादाकडून लक्ष ? ताजला उडवण्याच्या धमकीचे फोन

11
0

मुंबई : सणासुदीच्या तोंडावर दहशवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रोनसदृश उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याचं कळतं. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षेत वाढ करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसंच मुंबई आणि परिसरात ड्रोन तसंच फ्लाईंग ऑब्जेक्ट्स उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून याचाच फायदा घेत दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्यात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. यानुसार मुंबईत ड्रोन किंवा तत्सम गोष्टी उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here