Home Uncategorized हे सरकार कधी पडेल हे ठाकरे यांना समजणार पण नाही :...

हे सरकार कधी पडेल हे ठाकरे यांना समजणार पण नाही : आठवले

78
0

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी बोलतांना असे सांगितले की ‘ अहो यांचं हे सरकार कधी पडेल हे खुद्द उद्धव ठाकरे यांना सुद्धा कळणार नाही,त्यामुळे त्यांनी उगाच आमचे सरकार पाडा असे ओरडत सांगण्याची गरज नाही.

त्याचबरोबर आठवले असेही म्हणाले की, .भाजप – शिवसेना २५-३० वर्ष हिंदुत्वावर एकत्र होते. संघाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. संघात सगळे तयार झाले आहेत. मग भाजपवर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर माझे सरकार पाडा’, असे थेट आव्हान भाजपला दिले होते. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, असा खणखणित टोला लगावला आहे.

दरम्यान, नुकताच रिपब्लिकन पक्षात हरयाणात ब्राह्मण समाजाचे नेते मुरारीलाल चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर रामदास आठवले यांच्या पक्षाचे बळ हरयाणात देखील वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here