Home नांदेड लोहा पालिकेच्या कचरा डेपोला आग

लोहा पालिकेच्या कचरा डेपोला आग

५० लाखाच्या कचरा शेडचे नुकसान, ना मुख्याधिकारी आले ना ..ठेकेदार ..! घनकचरा व्यवस्थापनसाठी जवळपास ५० लक्ष रुपये खर्च करून सुविधा करण्यात आल्या आहेत. संबधित कंत्राटदार यांचे कामगार कचरा विलगीकरणा साठी असायला हवे पण तसे नसते याचा अनुभव प्रत्यक्ष पालिका कर्मचाऱ्यांना आग लागल्या नंतर आला.

173
0

मराठवाडा साथी न्यूज

लोहा :- लोहा नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी असल्यामुळे कामाची मर्यादा उघड झाली आहे.महिन्याकाठी अठरा लाख रुपयांचा खर्च घन कचरा व्यवस्थापनावर होतो. त्याच कचरा डेपोला सोमवारी सायंकाळ नंतर आग लागली ती आग विझविण्यास पालिका कर्मचाऱ्यांनी तीन तास अथक परिश्रम घेतले व आग आटोक्यात आणली. टेंडरवाले गायब होते तर संबधित अभियंता अनभिज्ञ होते. विशेष म्हणजे या दुर्घटनेकडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी फिरकलेच नाहीत.

 लोहा शहरातील कचरा डेपो हळदव शिवारात क्रीडा कार्यालयाच्या बाजूला आहे .घन कचरा व्यवस्थापनासाठी महिन्याला नगर पालिकेकडून जवळपास १८ लक्ष रुपये खर्च करते. शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे वजन करणे आणि त्याचे ओला व सुका कचरा वेगळा करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय त्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य आहे . ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले त्यातील अटी व नियमांचे पालन होते का नाही त्यावर देखरेख करण्यासाठी  नगर अभियंता व एक कर्मचारी  आहे.

परंतु नियमानुसार काहीच होत नाही. ज्या ठिकाणी कचरा डेपो आहे तेथे शहरातील कचरा संकलन केले जात नाही. रस्त्याच्या  कडेला कुठेही कचरा टाकला जातो. आठ महिन्यात किती खत निर्मिती झाली याची माहिती अद्यापही सार्वजनिक करण्यात आली नाही.कचरा डेपोला आग लागली. सदरील आगीची माहिती मुख्याधिकारी व पालिकेला तात्काळ कळविली तरी देखील पालिकेने आग विझवण्यासाठी कोणतीही तत्परता दाखविली नाही.

 घनकचरा व्यवस्थापनसाठी जवळपास ५० लक्ष रुपये खर्च करून सुविधा करण्यात आल्या आहेत. संबधित कंत्राटदार यांचे कामगार कचरा विलगीकरणा साठी असायला हवे पण तसे नसते याचा अनुभव प्रत्यक्ष पालिका कर्मचाऱ्यांना आग लागल्या नंतर आला. पालिका अधीक्षक उल्हास राठोड यांच्या नेतृत्वाखाली संतोष कानोडे, संग्राम नागरगोजे, बालू मंजलवाड, चांदू राजकौर, विष्णू भिसे, नाना पौळ यासह कर्मचाऱ्यांनी तीन तास अथक मेहनत घेतली व आग आटोक्यात आणली.

यावेळी संबधित कचरा कंत्राटदार मदतीला धावला नाही, की अभियंता, यांनी कसे झाले याची विचारपूस केली नाही.एकंदरीत पालिका प्रशासनावर कोणाचाच वचक नाही आणि कोणाचाच पायपोस कोणाला नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे.काम करणारे कर्मचारी राबराबताहेत .त्यांची साधी नोंद होत नाही.  पालिका कारभारात  शासकीय यंत्रणेची “वचक ” राहिलेली नाही. लाखो रुपयांचा खर्च घनकचऱ्यावर होतो.  पण ओला – सुखा त्याचे विघटन त्यावर प्रक्रिया त्यातून खत निर्मिती हे सगळं कागदावरच आहे.

आठ महिन्याच्या या सर्व घनकचरा प्रक्रियेची  तसेच .आग कशी लागली याची  जिल्हाधिकारी यांनी तटस्थपणे चौकशी करून संबधितावर कार्यवाही करावी अशी मागणी  शिवसेनेचे शहरप्रमुख मिलिंद पवार यांनी केली  आहे.

  हळदव ; आधी दुर्गंधी आता  धुरमय : हळदव गावाच्या हद्दीत असलेले हे घनकचरा डेपो मुळे या भागात दुर्गंधी पसरते शिवाय येथील कबरस्थान मध्ये कचरा टाकला जात आहे त्याला आम्ही प्रतिबंध केला तरी ठेकेदार ऐकत नाही त्याला आम्ही वारंवार विरोध केला असे  माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे यांनी सांगितले .आता एकत्रित येऊन विरोध करावा लागेल  शिवाय आज लागलेल्या आगीची माहिती    मुख्याधिकाऱ्यांना दिलीं पण त्यांनी   माहिती नाही  म्हणत हात झडकले. जबाबदारी घ्यायला कोणीच  लवकर पुढे   आले नाही आमचे गाव धुरमय झाले असे भीमराव पाटील शिंदे यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here