Home मनोरंजन मानसी नाईक अडकली “लग्नबेडीत”

मानसी नाईक अडकली “लग्नबेडीत”

81
0

आपल्या मनमोहक नृत्याने मनमोहीत करणारी मानसी नाईक नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.२०२१ या नव्या वर्षामध्ये या दोघांनी साताजन्माची गाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला मानसी व प्रदीप यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि आप्तेष्ट सहभागी झाले होते.

प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मानसीच्या नृत्यकौशल्याची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर आपल्या डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मानसीने आतापर्यंत ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here