Home क्राइम मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईकडून मोठा खुलासा

मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईकडून मोठा खुलासा

295
0

नवी दिल्ली : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी सध्या तुरुंगात असलेला कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई यांनी मोठा खुलासा केला आहे. एबीपी न्यूजशी साधलेल्या संवादात त्यानं हा खुलासा केला आहे. याच बिश्नोईनं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील जीवेमारण्याची धमकी दिली होती. बिश्नोईनं सांगितलं की, सिद्धू मुसेवाला याच्यावर मी नाराज होतो. त्याच्या हत्येचं प्लॅनिंग केलं गेलं होतं, पण मी त्याचा भाग नव्हतो. माझे भाचे गोल्डी ब्रार आणि सचिन यांनी मुसेवाला याला मारण्याची योजना आखली होती, असा खुलासाही त्यांन केला आहे.
सिद्धू मुसेवालाची हत्या का करण्यात आली ?
सिद्धू मुसेवालाची हत्या का करण्यात आली याचा खुलासा करताना बिश्नोईनं सांगितलं की, मुसेवाला याला मी माझा मोठा भाऊ मानत होतो, पण त्याच्यावर मी नाराज होतो. कारण आमच्या गँगच्या विरोधात तो कायम बोलायचा. तुरुंगातील आमच्या लोकांशी देखील तो वारंवार चर्चा करायचा. त्याची काँग्रेसमध्ये चांगली ओळख होती. त्यावेळी पंजाबचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्यासोबत तसेच अमरिंदर सिंह राजा वडिंग या पंजाब काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसोबतही मुसेवालाचे चांगले संबंध होते. त्यामुळं पोलिसही त्याच्या बाजूने होते. त्यावेळी आमच्या विरोधात तो बोलायचा पोलिसांना मदत करायचा, त्यामुळं आम्ही त्याच्याविरोधात होतो. त्याची हत्या झाली तेव्हा माझा फोन चालत नव्हता पण माझ्या सहकाऱ्यांनी हे कृत्य केलं, अशी कबुली लॉरेन्स बिश्नोईनं मुलाखती दरम्यान दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here