Home अर्थकारण बँकांना सुट्याच सुट्या..!

बँकांना सुट्याच सुट्या..!

3294
0

आपले आर्थिक व्यवहार तीन दिवसांत करा पूर्ण

परळी । मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत बँकांना सलग सुट्या आल्याने व्यापारी व नागरीकांना आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी आजपासून पुढील तीन दिवस महत्वाचे असून, मार्च महिना अखेर व एप्रिलची सुरूवात बँकांच्या सुट्यांनी होत असून, मध्यंतरी केवळ दोन दिवस बँका चालू राहणार आहेत. सुट्ट्याच सुट्या आल्याने या कालावधीत बँके संदर्भातील कामकाज अडचणीत येणार असून, आर्थिक व्यवहारांवर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात.

मार्च महिन्यातील २७ मार्च हा चौथा शनिवार, २८ मार्च रविवारची सुट्टी, २९ मार्च होळीची सुट्टी, त्यानंतर ३१ मार्च वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवसाची सुट्टी बँकांना असून, यामधील एक दिवस म्हणजेच ३० मार्चला बँका नियमितपणे सुरू राहतील. पाठोपाठ एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी वार्षीक खाते बंद करायचा दिवस असल्याने बँका चालू असल्या तरी कोणतेही व्यवहार होणार नाहीत. त्यानंतर २ एप्रिल रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असून, ३ एप्रिलला बँका सुरू असतील, परंतू दुसऱ्याच दिवशी ४ एप्रिलला रविवार अल्याने पुन्हा बँक बंद राहणार आहे. एका मागोमाग एखाद्या दिवसाचा अवकाश देऊन सलग सात दिवस बँका बंद राहणार आहेत. नागरीकांनी आपापली कामे या कालावधीत करण्याऐवजी दि.२४, २५ आणि २६ मार्चला करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here