नगर : जिल्ह्यातील पोलिसांच्या आत्महत्या काही केल्या थांबताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी राहुरी येथील आत्महत्या प्रकरण ताजे असताना आज बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील धोंडिबा गोरे वय वर्ष 50 यांनी श्रीगोंदा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुले व पत्नी सकाळी फुले आणण्यासाठी बाजारात गेली असताना गोरे यांनी लोखंडी अँगलला साडी गुंडाळून गळफास लावून घेतला. गेल्या एक महिन्यापासून ते रजेवर होते. आत्महत्येचे कारण अजून समजले नाही, पोलीस तपास सुरू आहे.