Home क्राइम भाचीला घरात एकटं पाहून मामाची नियत फिरली; १७ वर्षीय भाचीचा विनयभंग

भाचीला घरात एकटं पाहून मामाची नियत फिरली; १७ वर्षीय भाचीचा विनयभंग

645
0


मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

नागपूर : नागपुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम मामाने आपल्याच १७ वर्षीय भाचीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मामाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. श्रीराम (वय ३५ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या नराधम मामाचं नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मामा श्रीराम याला दारूचं व्यसन आहे. त्याची बऱ्याच दिवसांपासून आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवर वाईट नजर होती.दरम्यान, आरोपी २० फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घरी आला होता. यावेळी घरात तरुणी एकटीच होती. तरुणीला एकटं पाहून मामाची नियत फिरली. त्याने तिच्यासोबत बळजबरीने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने आरोपीला विरोध केला. यानंतर आरोपीने कोणाला सांगितले तर मी तुझा जीव घेईन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.मामाची धमकी ऐकून मुलगी घाबरली आणि तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. आरोपीचे यामुळे मनोबल वाढले आणि आई-वडील घरी नसताना तो घरी येऊन अश्लील कृत्य करू लागला.सततच्या छेडछाडीला कंटाळून पीडितेने हा सगळा प्रकार आईला सांगितला. यानंतर तरुणीने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.पीडितेच्या तक्रारीनंतर पाचपावली पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आता या नराधम मामाला अटक केली आहे. आपल्याच अल्पवयीन भाचीसोबत धक्कादायक कृत्य करणाऱ्या मामाचा कारनामा समोर येताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here