Home इतर टेम्पोच्या अपघातात ६०० कोबड्यांचा मृत्यू…!

टेम्पोच्या अपघातात ६०० कोबड्यांचा मृत्यू…!

80
0

मराठवाडा साथी न्यूज

सातारा : कराड तालुक्यातील पाटण ढेबेवाडी येथे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चालक सुखरूप आहे. मात्र,६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात कराड-ढेबेवाडी रस्त्यावर टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती.टेम्पो चालवितांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटला.घटनेची माहिती होताच शेतातील शेतकरी आणि इतर प्रवासी यांनी तत्काळ मदतकार्य केले.गाडीचे ब्रेक खराब झहल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज लावण्यात येत असून पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here