Home अर्थकारण जागतिक बाजारातून ३८.३६लाख कोटी कमी झाले

जागतिक बाजारातून ३८.३६लाख कोटी कमी झाले

230
0


मुंबई:दोन अमेरिकी बँका कोसळल्याने जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे फक्त तीन दिवसात जागतिक शेअर बाजारातील मार्केट कॅप ३८.३६ लाख कोटी रुपये (४६,५०० कोटी डॉलर) कमी झाले. न्यूयॉर्कपासून टोकियोपर्यंत जगभरातील बाजारपेठांमध्ये गुंतवणूकदारांनी बँकिंग शेअर्स विकल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे एमसीएसआय आशिया पॅसिफिक फायनेन्शियल्स इंडेक्स मंगळवारी सुरुवाती कारोबारातच २.७% घसरुन २९ नोव्हेंबरपासून ते आतापर्यंत निच्चांक पातळीवर आले.अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक कोसल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली. मंगळवारी आयटी, बँक आणि ऑटो शेअर्समध्ये घसरणीदरम्यान सेन्सेक्स ५८ हजाराखाली आले. ते ३३८ अंक घसरुन ५७,९०० वर बंद झाले. निफ्टीदेखील १११ अंकांच्या घसरणीसह १७,०४३ वर राहिले. ही त्यांची पाच महिन्यांतील नीचांकी पातळी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here