Home क्रीडा आजपासून सांगलीतच रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

आजपासून सांगलीतच रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

288
0

सांगली:पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत होणार की नाही होणार, या चर्चांचा धुरळा आज खाली बसला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलात मंडप उभारणीचा प्रारंभ झाला. दरम्यान, महाराष्ट्र केसरी कुस्तीप्रमाणेच या स्पर्धेत वजनगटांची रचना केली आहे. खुल्या गटात मात्र ६५ ते ७६ किलो दरम्यानच्या महिला मल्लांचा समावेश असेल. महिला कुस्तीपटू दि .२२ मार्च रोजी दाखल होत आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्यावहिल्या स्पर्धेसाठीची तयारी अंतिम टप्प्याकडे आहे. राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघातर्फे स्पर्धा होत आहे. कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले, “तीनवेळा महाराष्ट्र केसरी व एकवेळ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संयोजनाचा अनुभव आहे. कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सर्जेराव शिंदे राज्यभरातील लोकप्रतिनिधींना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.बेणापूर (ता. खानापूर) व बेडग ता. (मिरज) कुस्ती केंद्रातील ४० बाय ४० आकाराचे दोन मॅट स्पर्धेसाठी मागवले आहेत. क्रीडा संकुलात पश्चिमेकडील गॅलरीत शौकिनांची बसण्याची व्यवस्था आहे. राज्यभरातील ३० मान्यवर पंच नियुक्त केले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here