Home क्रीडा मराठवाडा विभागीय क्रीडा; शारीरिक शिक्षण शिक्षक संघाची निवड..!

मराठवाडा विभागीय क्रीडा; शारीरिक शिक्षण शिक्षक संघाची निवड..!

153
0


मराठवाडा साथी
औरंगाबाद : मराठवाडा विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सचिवपदी देवगिरी महाविद्यालयाचे प्राध्यापक राकेश खैरनार यांची निवड आणि जिल्हा क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी डी.आर खैरनार ,सचिवपदी विनायक राऊत व कार्याध्यक्षपदी डॉक्टर फारुख मोईनोद्दीन यांची निवड महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा शाखेची सर्व साधारण सभा झाली . राज्याध्यक्ष धारूरकर यांनी राज्यातील क्रीडा शारीरिक शिक्षण व शिक्षकांची आजची विदारक परिस्थिती आणि वास्तव्य शालेय शिक्षणका पुढे या निर्माण होणारे समस्या बाबत माहिती दिली यापुढे सर्व क्रीडा शिक्षकांना या समस्यांना सामोरे जाणे जाण्यासाठी संघटित राहणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.


महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे .महिला सक्षमीकरण हा हेतू साध्य करण्यासाठी महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे. क्रीडा शिक्षकाच्या जागा भरण्यासाठी प्रत्येक शाळा,महाविद्यालयात विद्यार्थी संख्येनुसार क्रीडा शिक्षकाच्या जागा भराण्यात यावे यासाठी शासन दरबारी आहे ,आज झालेल्या सभेत मराठवाडा विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पदी प्राध्यापक राकेश खैरनार यांची निवड करण्यात अली आहे .जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी डी .आर .खैरनार तर सचिवपदी ,विनायक राऊत व कार्याध्यक्षपदी डॉ. फारूकी मोहिनुद्दीन यांची निवड करण्यात आली आहे . यासाठी निवडणूक निरिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महानगर संघटनेचे अध्यक्ष,अंगद गरुड पाटील व सचिव अशोक आवारी पाटील व राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाल्मीक सुरसे हे उपस्थित होते या निवडणूक प्रक्रियेसाठी यशस्वी करण्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष शरच्चंद्र धारूरकर वाल्मिक सुरासे यशवंत यांनी परिश्रम घेतले .        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here