Home EHHTimes ठाणे ते डोंबिवली 30 किमीचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत

ठाणे ते डोंबिवली 30 किमीचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत

452
0


ठाणे: ठाणे आणि डोंबिवली या दरम्यानच्या प्रवासा करणाऱ्या वाहन धारकांना आता ३० किमी अंतर आता २० मिनिटात पार करता येईल .
मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारा चालू केलेले मोटागांव-माणकोली खाडी पूल 84 टक्के पूर्ण झाला आहे. यामुळे प्रवाशांना आता ठाणे ते डोंबिवलीचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे.
दरम्यान या कामाला वेग आल्याने पुढच्या तीन महिन्यात म्हणजे मे 2023 पर्यंत हे काम होण्याची शक्यता आहे. मे महिन्यानंतर वाहतूक सेवा या मार्गावरून सुरळीत होणार आहे. या दरम्यान प्रवाशांना ठाण्यावरून डोंबिवलीला पोहचायला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो.
मुंबई-नाशिक महामार्गावरून डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमधून जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने सिक्स लेन माणकोली पूल आणि उल्हास खाडीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
माणकोली-मोटागाव लिंक रोड 1.3 किमी लांबीचा आहे. गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीए या प्रकल्पावर काम करत असून महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी मंगळवारी प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here