Home ठाणे महेश आहेरची सीआयडी चौकशी

महेश आहेरची सीआयडी चौकशी

77
0


ठाणे :ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची सीआयडी चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप पुन्हा एकदा समाज माध्यमांवर प्रसारित झाली. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला धमकी दिली असल्याचा आरोपही आहेर यांच्यावर आहे. त्यामुळे महेश आहेरांविरोधात आव्हाड आक्रमक झाले.महेश आहेर या अधिकाऱ्याला प्रचंड माज असल्याचे आव्हाड म्हणाले. याच्यासंदर्भातील आम्ही ८ तासात ऑडीओ क्लिप बाहेर काढल्याचे देखिल आव्हाड म्हणाले. तसेच याबाबत अजून अनेक बाबी उघड होतील. त्याने माझ्या मुलीला धमकी दिली. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. मात्र अजूनही त्या अधिकाऱ्यावर कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही, असेही आव्हाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here