Home अर्थकारण आरबीआय कडून मोठ्या खाजगी बँकेवर कारवाई , २.२७ कोटींचा दंड ठोठावला

आरबीआय कडून मोठ्या खाजगी बँकेवर कारवाई , २.२७ कोटींचा दंड ठोठावला

223
0

मुंबई : गेल्या वर्षभरातआरबीआय ने अनेक सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. आता पुन्हा एकदा RBI ने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २.२७ कोटी रुपयांचा दंड एका बँकेला ठोठावला आहे. RBI ने एका मोठ्या खाजगी बँकेवर कारवाई केली. RBI ने RBL बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.आरबीआय ने एका खाजगी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने RBL ला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. आरबीआयने २.२७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नियामक अनुपालन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
याआधी नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) नियमांचे पालन न केल्याबद्दल RBI ने HDFC वर दंड ठोठावला होता. आरबीआयने एचडीएफसीला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. माहिती देताना, आरबीआयने सांगितले की, कंपनीच्या तपासणीत असे दिसून आले आहे.२०१९-२० या कालावधीत काही ठेवीदारांच्या मुदतपूर्ती ठेवी अशा ठेवीदारांच्या नियुक्त बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. नियम न पाळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे RBI ने सांगितलं आहे.अलीकडेच अशी बातमी आली होती की कर्जावरील दंड किंवा दंड म्हणून आकारण्यात येणाऱ्या व्याजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आरबीआय लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. यासाठी आरबीआयकडून मसुदा जारी केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here