Home इतर साऊथच्या या आयकॉनिक अभित्रीची ‘आत्महत्या’…!

साऊथच्या या आयकॉनिक अभित्रीची ‘आत्महत्या’…!

466
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : साऊथची आयकॉनिक अभिनेत्री वीजे चित्रा च्या आत्महत्येमुळे तामिळ टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.वीजे चित्रा रात्री २.३० च्या दरम्यान ईवीपी फिल्म सिटीमधीलशूटिंग संपल्यानंतर हॉटेवर आली होती. तिचा होणारा पती देखील याच हॉटेलमध्ये राहत होता. पोलिसांना चित्राच्या पतीने(रवी)दिलेल्या माहितीनुसार हॉटेलवर आल्यानंतर तिने रवीला अंघोळ करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.मात्र,बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. यानंतर तिचा मृतहेद सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत दिसला.

दरम्यान,आपल्या क्षेत्रातील अपयशासह तणाव आणि इतर काही कारणांमुळे आत्महत्या होत असल्याचे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येने भारताला धक्का बसला होता. त्यानंतरही बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील काही लोकांच्या आत्महत्यांनी खळबळ उडाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here