Home Uncategorized वजन कमी करण्यासाठी १ चमचा अळीव ठरतील फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी १ चमचा अळीव ठरतील फायदेशीर

403
0

वजन कमी करण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात. कधी कधी तर कितीही व्यायाम केला तरीही वजन हलण्याचे नावही घेत नाही. नुकतेच वजन कमी करण्याच्या पदार्थांमध्ये अळीवाचाही समावेश झाला आहे. तुम्ही सध्या Google Search केल्यानंतर सर्वाधिक सर्च होणारा शब्द सध्या अळीव अथवा हलीम दिसून येईल.
अळीव अर्थात Lepidium sativum असा इंग्रजी शब्द असणारा हा पदार्थ अरब देशातील असला तरीही आता भारतातही अधिक प्रमाणात वापरला जातो. औषधीय गुण असणारा हा पदार्थ आयुर्वेदात अधिक प्रमाणात वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यातील पोषक तत्व आणि औषधीय गुणांमुळे वजन घटविण्यासाठीही याचा उपयोग करता येतो असे आयुर्वेदिक डॉक्टरानी सांगितले. त्यांनी याचा फायदाही सांगितला आहे. जाणून घेऊया.

अळीवातील पोषक तत्वे
इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च अँड अलाईड सायन्सेसमध्ये अळीवाच्या फायद्यांवर संशोधनकर्ता हाना अल सईद, एस जिदान इत्यादींनी केलेल्या शोधाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले असून यामध्ये अळीवात अनेक औषधीय गुणधर्म असून फायटोकेमिकल्स पदार्थ असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये लेपिडीन घटक असून मूत्रवर्धक स्वरूपात काम करतात असेही सांगण्यात आले आहे.याशिवाय अळीव हे ग्लुकोसिनोलेट्स, फ्लेवोनाईड, यौगिक आणि सेमीलेपिडिनोसाईड अँटीकॅरनोजेनिक, अँटिऑक्सिडंट् आणि अँटीस्थमॅटिक स्वरूपातही कार्य करते. अळीवात जास्त प्रमाणात प्रोटीन, खनिज, फायबर आणि फायटोकेमिकल्स असतात असेही सिद्ध झाले आहे.

अळीव कसे करते वजन कमी
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं कि , अळीव हे शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असून अळीव खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. सहसा अळीव पाण्यात भिजवून नंतर दुधात शिजवून खीर स्वरूपात खाता येते. केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर निरोगी आहार म्हणूनही याचा उपयोग होतो.

कसे करावे सेवन?
डॉ यांनी सांगितल्याप्रमाणे अळीव हे सुपरफूडपैकी एक आहे. यामध्ये प्रोटीन स्रोत असून जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल आणि तुमच्या मांसपेशी सुधारायच्या असतील तर अधिक पोषणासाठी नियमित स्वरूपात १ चमचा अळीव तुम्ही समाविष्ट करून घ्या. रोज सकाळी तुम्ही उपाशीपोटी अळीव पाण्यातून खाऊ शकता. अळीवाचे लाडू करून रोज १ लाडू खाऊ शकता.

अळीवचे प्रमाण किती असावे?
तुम्ही जर नियमित स्वरूपात अळीव खाणार असाल तर १ टी स्पून इतका त्याचा वापर करावा. आठवड्यातून ३-४ वेळा तुम्ही याचे सेवन करू शकता. याचे प्रमाण अधिक करू नये.

कोणी अळीव खाऊ नये
अळीवाचे सेवन करणे ब्लड प्रेशर कमी करू शकते. तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास असेल अथवा हायपोथायरायडिजम असेल तर याचे सेवन करू नये. तसंच पोटॅशियमसंबंधित आजार असल्यासही अळीवाचे सेवन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अळीव खाऊ नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here