Home आरोग्य ४८५०० वर्षांपूर्वीचा झोंबी वायरस पुन्हा परतला, शास्त्रज्ञांचा मोठं खुलासा

४८५०० वर्षांपूर्वीचा झोंबी वायरस पुन्हा परतला, शास्त्रज्ञांचा मोठं खुलासा

396
0

सावधान सिनेमात पाहिलेले झोंबी वास्तवात पृथ्वीतलावर अवतरण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते आहे. झोंबी जिवंत करु शकतील असा व्हायरस शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे.

वॉशिंग्टन : सावधान सिनेमात पाहिलेले झोंबी वास्तवात पृथ्वीतलावर अवतरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. झोंबी जिवंत करु शकतील असा व्हायरस शास्त्रज्ञांनी शोधून काढल्याच्या बातम्यांनी सगळं चिंताग्रस्त झालं आहे. पृथ्वीच्या तळाशी असलेल्या स्तरावर बर्फ आणि मातीच्या एकत्र मिश्रणाला पर्माफ्रॉस्ट असं म्हणतात. आर्कटिकमध्ये उष्ण तापमानात सध्या अस्तिच्वात असलेले पर्माफ्रॉस्ट वितळू लागलेले आहेत. त्यांच्या वितळण्यानं हजारो वर्षांपासून जमिनीत असलेले निग्रावस्थेतील व्हायरस पुन्हा सक्रिय होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. यावेळी शास्त्रज्ञांनी ४८ हजार वर्ष जुना व्हारस विषाणू शोधून काढला आहे.

पर्माफ्रॉस्ट हे एखाद्या टाईम कॅप्स्युलप्रमाणे असतात. ज्या स्तरात हजारो वर्ष जुने मृतदेह आणि व्हायरस अजूनही अस्तित्वात असतात. पृथ्वीवर बदलत्या वातावरणात आर्कटिकमध्ये चौपट उष्णता निर्माण झालेली आहे. यात पर्माफ्रॉस्ट वितळत असल्यानं हजारो वर्षांपूर्वी जमिनीत गाडले गेलेले विषाणू पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हे व्हायरस पुन्हा जिवंत झाले तर जगाच्या सार्वजनिक आरोग्यावर याचा मोठा धोकादायक परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. पर्माफ्रॉस्टसाठी पृथ्वीचे काही नमुने घेण्यात आले आहेत. बर्फाच्या खाली असलेल्या या विषाणूंना झोंबी व्हायरस म्हणून ओळखण्यात येतंय.

२००३ साली असा पहिला व्हायरस शोधण्यात आला होता. या व्हायरसच्या आकारावरुन त्याचं नाव जायंट व्हायरस असं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर २०१२ साली ३० हजार वर्ष जुना व्हायरस शोधण्यात आला.२०१४ साली आणखी एक व्हारस शोधून तो प्रयोगशाळेतच बंद करुन ठेवण्यात आला. २०१५ सालीही आणखी एक व्हायरस शोधण्यात आलाय. आता हे सगळे व्हायरस जर सक्रिय झाले तर मानव आणि जनावरांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत त्यांना प्रयोगशाळे कैद करुन ठेवण्यात आले असले तरी त्याचा उद्रेक कधीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता शास्त्रज्ञांनी अमिबाच्या कोशींवर परिणाम करु शकेल असा व्हायरस शोधला आहे. मातीच्या खाली असलेला हा व्हायरस ४८५०० वर्ष जुना आहे. मातीच्या रेडिओ कार्बन डेटिंगनं तो किती जुना आहे हे शोधता येणं शक्य आहे. पर्माफ्रॉस्टमध्ये सापडलेले हे व्हायरस मानव समुहासाठी मोठा धोका ठरण्याची शक्यता मानण्यात येतेय. यातून कोरोनासारखी मोठी महामारी पुन्हा जगाला भेडसवण्याची भीती वर्तवण्यात येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here