Home अपघात बातमी मासा खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

मासा खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

464
0

मलेशिया : मासा खाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? तो ही मासा बाजारातून घेऊन घरी शिजवल्यानंतर. परंतु असा प्रकार घडला आहे. यामुळे मासे खाताना सावधान असणेही गरजे आहे. मासे खाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच त्या महिलेचा पती कोमात गेला आहे. ही घटना मलेशियामध्ये घडली आहे. त्या महिलेने पफर फिश खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांकडून यासंदर्भात स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. हा मासा जपानमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.

मृत महिलेच्या मुलीने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी स्थानिक दुकानातून पफर फिश विकत घेतला. हे मासे खाल्ल्यानंतर लगेचच आईला उलट्या होऊ लागल्या. काही वेळातच वडिलांची प्रकृतीही ढासळू लागली. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले.वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ते कोमात गेले आहेत.

का झाला मृत्यू
घटनेबाबत अन्न व औषध विभागाने सांगितले की, पफर माशांमध्ये टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन हे घातक विष असते. हे विष पदार्थ शिजवून आणि गोठवूनही नष्ट होत नाही. पफर माशांचे डिश तज्ज्ञांच्या देखरेखीत तयार केली जाते. त्यात असणारे विष काढले जाते. खरंतर जपानमध्ये या माशापासून बनवलेली डिश मोठ्या आवडीने खाल्ली जाते, पण ती फक्त कुशल शेफ बनवतात. कारण, त्यांना या माशातून विष काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

सायनाडपेक्षा घातक विष
तज्ज्ञांच्या मते पफर मासा अत्यंत विषारी आहे. त्याच्या अनेक प्रजाती आहेत. त्याचे विष सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त विषारी आहे. हा मासा मुख्यतः जपान, चीन, दक्षिण आफ्रिका, फिलीपिन्स आणि मेक्सिको सारख्या देशांमध्ये आढळतो. पफर दिसायला चेंडूसारखा गोल असतो. त्वचा काट्याने झाकलेली असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here