Home अर्थकारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; डोक्यावर कांद्याचे टोपले घेऊन विरोधक विधानभवनात

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; डोक्यावर कांद्याचे टोपले घेऊन विरोधक विधानभवनात

218
0

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करत आहे. ठाकरे गटाकडून प्रतोद म्हणून विलास पोतनीस यांचं नाव; विधान परिषदेत शिंदे गटाचं बळ अपुरं पडत आहे मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.दरम्यान राष्ट्रवादी आमदार कांद्याला भाव मिळावा म्हणून विधान भवनात कांदे घेऊन दाखल झाले आहे. इतकेच नव्हे तर विरोधकांनी गळ्यात कापूस, लसूण आणि कांद्याची माळ घातली असल्याचे पाहायला मिळाले. मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू असा इशारा यावेळी विरोधकांनी राज्य सरकराला दिला.विक्री झालेल्या कांद्याला प्रती किलो दहा रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली तर कांद्याला प्रतीकिलो 30 रुपये असा हमीभाव द्यावा अशी दुसरी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.तुरुंगातून नुकतेच बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवरील आंदोलनात सहभागी झाले आहेत. कांद्याला भाव मिळालाच पाहीजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांकडून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवींचा निषेध केला जात आहे. केंद्र व राज्य सरकार मिळून देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा पैसा मिळायालाच हवा राज्यात कांदा, तूर, कापूस, सोयाबिनला हमीभाव मिळालाच पाहीजे. मात्र, राज्य सरकारचे धोरण केवळ व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. आज अधिवेशनात याबाबत आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here