Home अंबाजोगाई पत्रकार संघ अंबाजोगाईच्या पुरस्कारांचे 6 जानेवारी रोजी वितरण

पत्रकार संघ अंबाजोगाईच्या पुरस्कारांचे 6 जानेवारी रोजी वितरण

190
0

कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार अशोकराव देशमुख तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रतापराव नलावडे यांना जाहीर

अंबाजोगाई
पत्रकार संघ अंबाजोगाई यांच्या वतीने दिल्या जाणा-या कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार अशोकराव देशमुख (बीड) तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी पत्रकार प्रतापराव नलावडे (बीड) यांची निवड करण्यात आली आहे.दोन्ही मान्यवर पत्रकारांचा बुधवार,दि.6 जानेवारी 2021 रोजी अंबाजोगाईत विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा,आमदार संजय दौंड,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,माजी आमदार पृथ्वीराज साठे,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे या मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे.बुधवार,दि.6 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6.00 वाजता नगरपरिषद मिटिंग हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दर्पण दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंगळवार,दि.29 डिसेंबर 2020 रोजी पत्रकार संघ,अंबाजोगाईच्या कार्यकारिणीची बैठक झाली.या बैठकीत दर्पण दिन-2021 आयोजन व स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण या बाबत चर्चा होवून सर्वानुमते ठरले.बैठकीचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघ अंबाजोगाईचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार हे होते तर यावेळी माजी अध्यक्ष प्रकाश लखेरा, अविनाश मुडेगावकर, अभिजित गाठाळ, प्रशांत बर्दापूरकर, शिवकुमार निर्मळे, रमाकांत पाटील,रवि मठपती,रणजित डांगे,अभिजित गुप्ता, विजय हमिने,अशोक कचरे,जयराम लगसकर,ज्ञानेश मातेकर,नागेश औताडे,शेख वाजेद आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here