Home अंबाजोगाई दोन वर्षांची लाईफ असनाऱ्या मोबाईलच संरक्षण आपण करतो मात्र आपल्या अनमोल शरीराच ...

दोन वर्षांची लाईफ असनाऱ्या मोबाईलच संरक्षण आपण करतो मात्र आपल्या अनमोल शरीराच  करत नाहीत—- 

610
0

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

    दोन वर्षांची लाईफ असनाऱ्या मोबाईलच संरक्षण आपण करतो मात्र आपण आपल्या अनमोल शरीराच संरक्षण करत नाहीत ही खेदाची बाब असल्याने रस्ता सुरक्षा मोहिमेच्या माध्यमातून युवकांच्या जनजागृती साठी विशेष कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी  केले.

    येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभाग अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने
32 व्या रस्ता सुरक्षा अभियानचे उदघाटन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी
व उप विभागीय अधिकारी शरद झाडके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर,
प्राचार्य श्रीमती वनमाला गुंडरे, मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

  या वेळी बोलताना स्वाती भोर म्हणाल्या की, ईतर कारणा पेक्षा अपघाता मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. मानवी चुका मुळे अधिक मृत्यू होतात. नियमांची जाणीव करून देणे हा अभियानाचे उद्देश असतो. नियम तोडताना आपण स्वतःला फसवत असतो हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण 2 वर्षांची लाईफ असनाऱ्या मोबाईलचा सरक्षण करतो मात्र आपण अनमोल शरीराच संरक्षण करत नाहीत. या मोहिमे मध्ये वाहनांना रिफ्लेकटर लावणे, चालकांची नेत्र तपासणी मोहीम हाती घ्यायला हवी.

   या वेळी बोलताना शरद झाडके म्हणाले की, अपघातात तरुण वर्ग जातोय ही अत्यंत वेदनादायी गोष्ट असुन माझे स्वतःचे दोन भाऊ अपघातात मयत झाले त्या मुळे घरातील युवक गेला तर कुटुंबावर काय बेतते ती गोष्ट आज ही आम्ही भोगतोयत, नियम सर्वाना माहीत आसतात मात्र समाजात या नियमा कडे दुर्लक्ष केल्या जाते. जो जीवांची काळजी करतो त्या कडेच पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आसतो. सीटबेल्ट घातल्यावर एअरबॅग उघडते हे अनेकांना कळत नाही त्या मुळे सीटबेल्ट लावण्याकडे दुर्लक्ष केल्या जाते.  

    या वेळी बोलताना श्रीमती वनमाला रेड्डी यांनी वाहन चालवणारानी वाहने अत्यंत काळजी पूर्वक चालवली पाहिजेत परिवहन विभागाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थाना उपयुक्त मार्गदर्शन केले.

   कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर म्हणाले की आज पर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येत असे आज सर्वत्र रस्ता सुरक्षे निमित्य एक महिना कार्यक्रम होत आहेत. देशभरात दरवर्षी 5 लाख अपघात होतात या मध्ये दीड लाख लोक मृत्यू मुखी पडतात यात 75 हजार मयत युवक गटातील असून ही चिंतेची बाब आहे. अपघाता पासून शरीराची हानी होऊ या साठी रस्ता सुरक्षे कडे पाहिलं जातं, आज रस्त्याची अवस्था चांगली झाली आहे, वाहने बेफान धावत आहेत. यात मानवी चुकीमुळे अपघात होतात, वाहन चालवताना मोबाईलचा वापर केला जातो तो करता कामा नये. मोबाईल वापरल्याने लक्ष विचलित होत. स्पीड बेल्टचा वापर केला जावा. दुचाकी स्वाराने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालवू नये आशा सूचना ही त्यांनी उपस्थित युवकांना दिल्या.

   या कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ मरकाळे यांनी तर आभार वाहन निरीक्षक मोरे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहन निरीक्षक मोरे, वाहन निरीक्षक नळेकर, उमाकांत कदम यांच्या सह प्रा पी के जाधव, प्रा प्रशांत जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here