Home अर्थकारण AUTO, IT शेअर्समध्ये घसरण:सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला

AUTO, IT शेअर्समध्ये घसरण:सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला

435
0

एका दिवसांच्या तेजीनंतर आज पुन्हा बाजार कोसळला भारतीय शेअर बाजारात या आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे 2 मार्च सुरूवातीलाच शेअर बाजारात
घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 530 अंकानी घसरला. तर निफ्टी 17,350 अंकावर व्यवहार करत आहे. दरम्यान, सुरूवातीलाच ऑटो आणि आयटी
शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.मार्केटच्या सुरुवातीच्या सत्रात बँकिंग, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होत असताना आयटी, ऑटो, फार्मा,
एफएमसीजी, मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरणीच्या व्यवहार होत आहे. तर स्मॉल कॅप किंचित वाढीसह तर मिडकॅप निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहे.
याशिवाय सेन्सेक्सच्या 30 पैकी 8 शेअर्स वाढीसह तर 22 समभागात घसरण होत आहेत. तसेच निफ्टीच्या 50 समभागांपैकी 15 स्टॉक्समध्ये वाढ तर 35 मध्ये
घसरणीसह व्यवहार होत आहेत.भारतीय शेअर बुधवारी बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 448.96 अंकांनी म्हणजेच 0.76 टक्क्यांनी वाढून 59,411 वर बंद
झाला. निफ्टी देखील 146.95 अंक किंवा 0.85% वाढला. तो 17,450.90 च्या पातळीवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 28 समभाग हिरव्या
तर 2 समभागांनी कमजोरी दर्शविली. आजच्या टॉप गेनर्समध्ये एसबीआय, अक्सिस बॅंक, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, टीसीएस, एचसीएल टेक, टाटा स्टील, मारुती,
टाटा मोटर्स यांचा समावेश आहे. पॉवर ग्रिड आणि एचडीएफसी बँक सर्वाधिक तोट्यात होते.आज अदानी समूहाच्या सर्व 10 समभागांमध्ये जोरदार वाढ झाली आहे. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 15.78% वाढून 1,579 रुपयांवर बंद झाले. ग्रीन एनर्जी, पॉवर, टोटल गॅस, ट्रान्समिशन, विल्मर आणि
एनडीटीव्हीचे शेअर्स प्रत्येकी 5% वाढून बंद झाले. अदानी पोर्ट्स 2% वाढले. समूहाचा सिमेंट स्टॉक एसीसी 2.13% आणि अंबुजा सिमेंट 3.62% वर चढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here