Home महाराष्ट्र नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी करणार डिजिटल पद्धतीचा उपयोग

नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी करणार डिजिटल पद्धतीचा उपयोग

432
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीती झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये आता पक्षाध्यक्षाची निवड सुरु झाली आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत.गांधी घराण्यातील अध्यक्ष असण्याला आता काही जेष्ठ नेते विरोध करत आहेत तर अनेक नेत्यांचा राहुल गांधी हेच पुन्हा अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा आहे.सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर नसल्याचा मोठा फटका देखील पक्षाला बसत आहे त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेसचा कोण अध्यक्ष होणार या मुद्द्याची चांगलीच चर्चा घडेल अशी शक्यता आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटी च्या सदस्यांकडून डिजिटल आयडी कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पक्षातील ‘सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी’ मतदारांची यादी बनवण्याचं काम सुरू आहे. अथॉरिटीकडून स्टेट युनिटसकडे एआयसीसी प्रतिनिधींचा डिजिटल फोटो मागवण्यात आला आहे.यामध्ये जवळपास १५०० प्रतिनिधी या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here