Home देश-विदेश आजाराने ग्रस्त पुतीन प्रेयसिच्या सांगण्यावरून राष्ट्रपतीपद सोडणार ?

आजाराने ग्रस्त पुतीन प्रेयसिच्या सांगण्यावरून राष्ट्रपतीपद सोडणार ?

518
0

मॉस्को : जगातील सर्वात शक्तीशाली नेता आणि गेल्या 20 वर्षांपासून राज्य करणारे व्लादिमीर पुतिन 2021मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांची प्रेयसी जिमनास्ट अलीना कबाइला आणि तिच्या दोन मुलींनी पुतीन यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. असा दावा केला जात आहे की पुतिन पार्किन्सन (Parkinson ) आजाराशी झुंज देत आहेत. अलीकडेच पुतिन यांचे काही फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर ते गंभीर आजारी असल्याचे स्पष्ट झाले होते.

मॉस्कोचे राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवे यांनी ब्रिटीश वृत्तपत्र द सनला सांगितले की, रशियाचे राष्ट्रपती यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली यांनी पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. ते म्हणाले, ‘पुतीन यांचे एक कुटुंब आहे आणि त्यांचा रशियन राष्ट्रपतींवर खोल प्रभाव आहे. जानेवारीत पुतिन सर्व अधिकार दुसऱ्याला देऊन राष्ट्रपतीपद सोडू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here