Home छत्रपती संभाजी नगर पाच हजार पत्रे संभाजीनगरच्या समर्थनार्थ लिहिणार : सुमीत खांबेकर‎

पाच हजार पत्रे संभाजीनगरच्या समर्थनार्थ लिहिणार : सुमीत खांबेकर‎

264
0


छत्रपती संभाजीनगर‎:औरंगाबादच्या नामकरणास विरोध ‎ ‎ करत एमआयएमने आंदोलन केले ‎ ‎आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता ‎ ‎ छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ ‎ ‎ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात ‎ ‎ उतरली असून, त्यासाठी १६ मार्च ‎ ‎ रोजी विभागीय आयुक्तालयावर ‎ ‎ स्वप्नपूर्ती रॅली काढणार आहे. या ‎ ‎ माध्यमातून नामकरणाच्या‎ समर्थनार्थ पाच हजार पत्रे देण्यात‎ येतील, अशी माहिती मनसेचे‎ जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी‎ मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.‎ केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव‎ बदलून छत्रपती संभाजीनगर केले.‎ त्यामुळे संपूर्ण राज्यासह शहरात‎ प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.‎ मात्र, यात काही लोक विरजण‎ घालण्याचे काम करीत असल्याचा‎ आराेप खांबेकर यांनी केला.‎रॅलीतून शक्तिप्रदर्शन , आयुक्तांना निवेदन देणार‎ खांबेकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर नावाला ज्याप्रमाणे विरोध होईल,‎ त्याचप्रमाणे उत्तर देण्यात येईल. शहरातील नागरिकांचे अनेक दशकांपासूनचे‎ स्वप्न पूर्ण झाले आहे. त्या सर्वांना सोबत घेऊन मनसेने स्वप्नपूर्ती रॅली‎ आयोजित केली आहे. ही रॅली गुरुवारी सकाळी ११:३० वाजता संस्थान गणपती‎ येथून सुरू होणार असून, हजारो पत्रके आणि समर्थन पत्रे विभागीय आयुक्तांना‎ देण्यात येणार आहेत. या वेळी दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे,‎ सतनामसिंग गुलाटी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here