Home औरंगाबाद मनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले

मनसेने औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले

5449
0

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने आंदोलन


औरंगाबाद : शहराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार रविवारी पहाटे मनपा आयुक्तांच्या जलश्री या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले. हा प्रकार उघडकीस येताच शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद शहरात काही भागात ५ तर काही भागात तब्बल ८ दिवसातून म्हणजे आठवडयातून एकदा पाणीपुरवठा होतो आहे. शहराला आठवडाभरात किमान दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसेने नुकतीच केली होती. ही मागणी दहा दिवसात मान्य न झाल्यास मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर यांनी दिला होता. त्यानुसार आज पहाटे मनसे पदाधिकाऱ्यांनी हे नळ कनेक्शन तोडले.
……..
आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याची पालकमंत्र्यांनी केली होती सूचना
शहराच्या १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजून तीन वर्षांचा अवधी आहे. यामुळे सध्या जुन्या
पाणी पुरवठा योजनेत सुधारणा करुन नागरिकांना आठवड्यातून किमान दोनवेळा पाणी द्या अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (२८ जून) मनपाला केल्या. पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते शहागंज चमन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे सोमवारी अनावरण करण्यात आले. शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांचे या योजनेच्या कामावर लक्ष आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना समान मुबलक पाणी मिळेल. पण तोपर्यंत काय? असा प्रश्‍न मला केला जात आहे. अनेक भागात आठ दिवसाला एक तर काही भागात दोन वेळा पाणी मिळते. संपूर्ण शहरात आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्यासाठी प्रशासनाने उपाय-योजना कराव्यात, अशा सूचना देसाई यांनी यावेळी केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here