Home अहमदाबाद यंदाची आयपीएल कोण गाजवणार?

यंदाची आयपीएल कोण गाजवणार?

945
0

आजपासून आयपीएलचा सोहळा सुरु होणार आहे.सुरुवातीचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा असणार.यंदाचा विजेता कोण ठरणार, कोण ऑरेंज कॅप-पर्पल कॅप पटकावणार, यासारखे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली . काही स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे. अशाच काही दिलेल्या खेळाडूंची माहिती घेतली आहे .

जोफ्रा आर्चर (मुंबई इंडियन्स)-
यंदा बुमराहच्या अनुपस्थितीत मुख्य गोलंदाजाची भूमिका असणार .चाहत्यांसह फ्रेंचाइजीकडून मोठ्या अपेक्षा आहे .

फाफ डू प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
हेझलवूड, मॅक्सवेल सुरुवातीला नसल्याने कर्णधार म्हणून कसोटी लागणार. संघाला अद्याप जेतेपद पटकावता न आल्याने कर्णधार म्हणून सिद्ध करण्याची संधी आहे.

IPL 2022: विराट कोहली के बाद RCB के नए कप्तान बने फाफ डु प्लेसिस

डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कैपिटल्स)
कर्णधारपद भूषविताना लौकिकानुसार खेळण्याचे आव्हान.
आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यास ऑस्ट्रेलियन संघातील निवड धोक्यात.

हॅरी ब्रूक (सनराइजर्स हैदराबाद)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात अल्पावधीतआपला दणका दिला. हैदराबाद संघाकडून स्वतःला स्टारक्रिकेटपटू म्हणून घडविण्याची ब्रूककडे मोठी संधी.

लोकेश राहुल (लखनऊ सुपर जायंट्स)
सातत्याने फलंदाज म्हणून चमकतो; पण जेतेपद मिळवण्यात अपयशी.हे के एल राहुल समोर मोठे आव्हान आहे.

हार्दिक पांड्या (गुजरात टाइटंस)
जेतेपद कायम राखण्याचे आव्हान. तंदुरुस्ती कायम राखणेही महत्त्वाचे ठरेल.यावर्षी आपल्या संघाला यशस्वी करण्याचा मागे असणार.

रविंद्र जडेजा(चेन्नई सुपर किंग्स)
मागच्या सत्रात नाराजीमुळे संघासोबत संबंध बिघडले होते. संघाचे कर्णधारपद मिळाले नसल्याने स्वत:ला सिद्ध
करण्यासाठी खेळेल. अष्टपैलू म्हणून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

उमरान मलिक (सनराइजर्स हैदराबाद)
आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने त्याच्या गोलंदाजीवर लक्ष राहील. सातत्याने दीडशेच्या आसपास वेगाने मारा करण्याची क्षमता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here