Home देश-विदेश भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या गर्भवती डीएसपी ; तरीही रिकामटेकड्याची भटकंती

भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या गर्भवती डीएसपी ; तरीही रिकामटेकड्याची भटकंती

12610
0

मराठवाडा साथी टीम
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही गांभीर्य नसलेले अनेक रिकामटेकडे रस्त्यांवर भटकत आहेत. मात्र, या संकटाच्या काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून पोलीस, डॉक्टर, यासह अत्यावश्यक सेवेतील सर्व कोरोना योद्धे खंबीरपणे दोन हात करत आहेत. दंतेवाडा, छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू याचेच मूर्तिमंत उदाहरण ठरल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू या पाच महिन्याच्या गर्भवती आहेत. अशा वेळी देखील त्या भर उन्हात उभे राहून लोकांना विनाकारण घराबाहेर न पाडण्याचे आवाहन करत कोरोना विषाणूची दाहकता समजावून सांगत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटात रणरणत्या उन्हात रस्त्यावर उभ्या राहून त्या आपले कर्तव्य बजावत आहे. हे छायाचित्र सोमवारचे आहे, जेव्हा स्वत: डीएसपी शिल्पा रस्त्यावर उतरल्या आणि अनावश्यकपणे घर सोडणाऱ्या लोकांना सल्ला देत आहेत. आपल्या टीमसमवेत कर्तव्यावर हजर असताना त्यांनी अनेकांवर दंडात्मक कारवाई देखील केली. शिल्पा यांनी लोकांना आवाहन केले की, आज आम्ही रस्त्यावर उभे आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहू शकाल. आयपीएस अधिकारी दिपांषु काब्रा यांनी मातृत्वासह कर्तव्य बजावणाऱ्या शिल्पा साहू यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यावर नेटकरी देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी शिल्पा यांचे खूप कौतुक केले आहे. इतक्या कठीण काळात आपल्या गर्भातील बाळाची आणि सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची वाहवा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here