Home क्राइम 50 हजाराची लाच घेतांना पीएसआय जाळ्यात

50 हजाराची लाच घेतांना पीएसआय जाळ्यात

8
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्विकारणाऱ्या सिटीचौक पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष पाटेला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी पोलिसांनी पकडले.
सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदार प्रयत्नशील होता. त्या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीाक्षक संतोष रामदास पाटे (वय-३०, रा. पडेगाव) यांच्याकडे होता. त्यामुळे तक्रारदाराने त्यांच्याकडे अनेक चकरा मारल्या. शेवटी त्या गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी पाटेने त्याला रोख ५० हजार मागितले.
तक्रारदार एसीबीकडे : तो तक्रारदार चकरा मारून थकला होता. त्यामुळे त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) पाटेंची तक्रार दिली. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री एसीबीने ट्रॅप लावला. त्यानंतर ५० हजाराची लाच घेतांना पाटेला रंगेहाथ एसीबपीच्या पथकाने पकडले. ही कारवाई निरिक्षक संदीप राजपूत यांच्यासह पथकातील गणेश पंडुरे, गोपाल बरंडवाल, किशोर म्हस्के, केवल घुसिंगे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here