Home Uncategorized चाकूच्या जोरावर लुटणार्‍या चोरट्याला घरातच पकडले, मुद्देमालही ताब्यात

चाकूच्या जोरावर लुटणार्‍या चोरट्याला घरातच पकडले, मुद्देमालही ताब्यात

परळीतील घटना : भंडारी कुटुंबाच्या तत्परतेमुळे चोरटा गजाआड

35
0

परळी : येथील घरणीकर रोडवरील एका घरात अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. दरम्यान तत्परतेने भंडारी कुटुंबीयांनी चोरट्यास घरातच पकडून ठेवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या चोरट्यास परळी शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

गुरुवारी सकाळी ११ वाजता येथील घरणीकर रोडवरील व्यापारी सूर्यप्रकाश भंडारी यांच्या घरात तोंडावर रुमाल बांधून एक ६२ वर्षीय इसम घरात घुसला व थेट स्वयंपाक घरात गेला. तेथे एका महिलेने आरडाओरड करताच चोरटा बाहेरच्या खोलीत आला. तेथे बसलेल्या सविता सूर्यप्रकाश भंडारी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून दीड लाख रुपये किमतीचे सोने दागिने बळजबरीने हस्तगत घेतले. तो बाहेर पडणार

इतक्यात घरात असलेले सूर्यप्रकाश भंडारी यांनी तात्काळ पकडले. आरडाओरड सुरू होताच शेजारील व्यापारीही धावून आले. घरातच चोरट्यास पकडून ठेवले व त्याची कल्पना पोलिसांना देण्यात आली.शहर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल होत चोरट्यास अटक केली.

पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव शेख इफ्तेखार शेख हाजी रा. परळी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सविता सूर्यप्रकाश भंडारी यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here