Home लाइफस्टाइल शौचालयाची इमारत जेव्हा ” आर्ट गॅलरी ” होते ……..

शौचालयाची इमारत जेव्हा ” आर्ट गॅलरी ” होते ……..

446
0

शौचालयाची इमारत ते आर्ट गॅलरी – उटीच्या आर. मणिवन्नम या कलाकाराची कमाल

तामिळनाडू :आत प्रवेश करताच पिचकाऱ्यांची झलक ,दूरपर्यंत जाणारा दुर्गंध ,पाण्याची कमतरता अशी ओळख असते ती सार्वजनिक शौचालयांची. कोणाला एक क्षण थांबू वाटणार अशी हि जागा . मात्र याच ठिकाणी आज लोक गर्दी करतायेत . फोटो काढतायेत. अश्या दुर्गंधीयुक्त जागेचे रूप पालटण्याचे कर्तब केले आहे ते तामिळनाडूच्या आर. मणिवन्नम या कलाकाराने . कलाकार एका विक्षुप्त वस्तूही एवढी हसीन बनवू शकतो. याचे कसब ते कलाकारातच असते. मग् अश्या दुर्गंधीयुक्त शौचालयात जर आर्ट गॅलरी असेल तर ?विश्वास बसणार नाही ना ,पण हे खरे आहे.

ही कमाल केली आहे तामिळनाडू येथील कलाकारांनी . उटी या शहरातील एक सार्वजनिक शौचालयासाठी असलेली इमारत कोणी वापरलीच नाही . धूळखात पडलेली ही इमारत आज ” द गॅलरी वन टू”या नावाने सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. याचे कारण म्हणजे येथे बनलेली आर्ट गॅलरी.

नगरपालिकेचा पुढाकार :
उटीतील हा चमत्कार करुन दाखवला आहे काही कलाकारांनी. आयएएस अधिकारी असणाऱ्या सुप्रिया साहू यांनी ट्विटवरुन यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “एक वापरात नसणाऱ्या शौचालयाच्या इमारतीलाच आर्ट एक्झिबिशन सेंटर म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. या आर्ट गॅलरीचे नाव द गॅलरी वन टू असं ठेवण्यात आलं आहे. नगरपालिकेने येथून जवळच नवीन सार्वजनिक शौचालक उभारलं असल्याने या इमारतीमध्ये आर्ट गॅलरी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली,” असं साहू यांनी व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

मोफत सेवा देणारे ग्रंथालय :
मिळालेल्या माहितीनुसार या आर्ट गॅलरीमध्ये एक छोटं ग्रंथालयही सुरु करण्यात आलं आहे. हे ग्रंथालय स्थानिकांसाठी मोफत सेवा देणार आहे. येथे बसून स्थानिकांना निवांतपणे पुस्तके वाचता येणार आहेत. आर. मणिवन्नम या कलाकाराने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणलीय. या आर्ट गॅलरीत मणिवन्नम यांचीही काही चित्र लावण्यात आली आहेत. लोक सध्या या आर्ट गॅलरीला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here