Home Uncategorized पोलीसाची ड्रोनने कडक नजर…!

पोलीसाची ड्रोनने कडक नजर…!

104
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सगळीकडे नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली. प्रत्येकजण आपापल्या परीने वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरवातीला सेलिब्रेशनची तयारी सुरु करत आहे . पण कोरोना संकटामुळे यंदाचे सेलिब्रेशन दरवर्षीपेक्षा वेगळं असणार आहे.गच्चीवरील पार्ट्यांवरही पोलिसांचा वॉच ठेवणार आहे. मुंबई पोलीस ड्रोनद्वारे गच्चीवर होत असलेल्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत.वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱया मुंबईकरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मुंबईत रात्री ११ ते पहाटे पर्यंत जमावबंदी असल्याने चारपेक्षा अधिक जणांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही. गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे ३५ हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here