Home महाराष्ट्र साम दाम दंड भेदाचं डॉक्टरेट आमच्याकडेही – संजय राऊत

साम दाम दंड भेदाचं डॉक्टरेट आमच्याकडेही – संजय राऊत

207
0

प्रताप सरनाईक यांच्या ईडी कारवाईवरून संजय राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीची पथकं दाखलं झाली असून शोधमोहीम सुरु आहे. या कारवाई विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध करुन भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त करताना संजय राऊत यांनी भाजपला ‘शिखंडी’ची उपमा दिली. “ईडीने भाजपच्या कार्यालयातच शाखा उघडली असेल. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. अटक करायची असेल तर करा, नोटीस कसल्या पाठवता, हिंमत असेल घरी या. सरनाईक घरात नसताना त्यांच्या घरात धाड टाकली आहे ही नामर्दानगी आहे. भाजपने सरळ लढावं, शिखंडीसारखं नाही. ईडी किंवा सीबीआयचा वापर करुन, केंद्रीय सत्तेचा वापर करुन लढायचा प्रयत्न करत असेल तर विजय आमचाच आहे,” असं शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

“मानसिक त्रास द्यायचा हे उद्योग तुमच्यावर उलटतील, ती वेळ आली आहे. साम दाम दंड भेदाचं डॉक्टरेट आमच्याकडेही आहे. आमचा जन्मच त्यामधून झाला,” असेही राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here