Home इतर देशातील सर्वात मोठ्या ‘एक्सप्रेस-वे’ ची होणार निर्मिती…!

देशातील सर्वात मोठ्या ‘एक्सप्रेस-वे’ ची होणार निर्मिती…!

562
0

मराठवाडा साथी न्यूज

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे देशातील सर्वात मोठ्या ‘एक्सप्रेस-वे’ची निर्मिती वाराणसी येथे होणार आहे.येत्या ३० नोव्हेंबर ला पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे जाऊन.तेथील प्रसिद्ध वाराणसी-प्रयागराज या‘गंगा एक्सप्रेस वे’चे उदघाटन करणार असल्याची माहिती माध्यमांद्वारे समोर आली आहे. हि एक्सप्रेस वे ६ लेन ची असणार आहे. ह्या एक्सप्रेस वे ची लांबी १,०२० किमी असून. हा एक्सप्रेसवे तयार करण्यासाठी सुमारे ३७,००० कोटी रुपये खर्च लागणार आहेत. या प्रकल्पाची सुरुवात उत्तर प्रदेश सरकारने यावर्षी जानेवारीमध्ये केली आहे.

वाराणसी येथे तयार होत असणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वेबाबत बोलतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याअगोदर म्हणाले होते कि, ‘६,५५६ हेक्टर क्षेत्रावरील हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल. हा महामार्गाचा प्रकल्प दोन टप्प्यात विकसित केला जाईल. गंगा एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्यात ५९६ किमी लांबी पूर्ण करण्यात येईल आणि मेरठ, ज्योतिबा फुले नगर, हापूर, संभळ, बदायूं, शाहजहांपूर, फर्रुखाबाद, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज या जिल्ह्यांना जोडले जाईल. यामध्ये मोठे पूल, रोड-ओव्हरब्रिज आणि १८ उड्डाणपूल असतील. या द्रुतगती मार्गावर लेन, लेनचा विस्तार अत्यंत योग्य व संपूर्ण प्रवेश नियंत्रित द्रुतमार्ग असेल. हा रस्ता पश्चिम यूपीला पूर्व यूपीला जोडेल.

कुठे सुरु होऊन,कुठे संपेल एक्सप्रेस वे

हा एक्स्प्रेस वे मेरठमधील ‘शंकरपूर’ गावाजवळील एनएच –२३५ पासून सुरू होईल आणि प्रयागराज जिल्ह्यातील ‘सोरांव‘ जवळ एनए –३३० पर्यंत संपेल.

गंगेकिनारी होणार वृक्षलागवड

माध्यमांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकारने गंगा एक्सप्रेसवेच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अभियान सुरू करण्याची योजना तयार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here