Home पुणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुनबाई स्वामिनी सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुनबाई स्वामिनी सावरकर यांचे निधन

216
0

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांच्या सुनबाई आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे निधन झाले आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या. सावरकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपण्याचे काम स्वामिनी सावरकर यांनी अखेरपर्यत केले.
स्वामिनी सावरकर यांनी विक्रम सावरकर यांना त्यांच्या संघटनात्मक कार्यामध्ये मोलाची साथ दिली होती. स्वामिनी यांच्या जाण्यानं त्या संघटनांची मोठी हानी झाली. त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले म्हणून परिचित होत्या. नागपूर येथील पांडुरंग गोखले परिवारात त्यांचा १८ डिसेंबर १९३९ या दिवशी जन्म झाला. त्यांचे लग्न नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव यांच्याशी झाला.
‘प्रज्वलंत’ या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज स्वामिनी या पाहत होत्या. मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या उभारणीत तसेच संस्थेचे कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग होता. विक्रमराव सावरकर यांच्या ‘युद्ध आमुचे सुरु’ तसेच ‘कवडसे’ या पुस्तकांच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here