Home मनोरंजन नोरा फतेहीला करायचेय “तैमूरशी “लग्न ?

नोरा फतेहीला करायचेय “तैमूरशी “लग्न ?

205
0

मुंबई : करीन आणि सैफचा लाडका तैमूर याला अभिनेत्यांप्रमाणेच स्टारडम आहे. त्यात त्याला नेहमीच मीडियाचा घेराव असतो. आता नुकतेच एका अभिनेत्रीने चक्क तैमूरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हि अभिनेत्री दुसरी कोणी नसून नोरा फतेही आहे. तिने नुकतेच करीनाच्या “व्हॉट वूमन वॉन्ट ” या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यात करिनाने तिला तैमूर तुझ्या डान्स मूव्हचा दिवाना आहे,असे सांगितले. यावर नोराने थेट तैमूरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. “तैमूर लवकर मोठा होईल ,अशी आशा व्यक्त करते.जेव्हा तो मोठा होईल तेव्हा मी त्याच्याशी लग्नाचा विचार करेल “असे नोरा करीनाला म्हणाली .यावर करिनाने हसतच तो “४ वर्षांचा आहे, आणि त्याला अजून वेळ आहे”असे म्हटले.

यावर नोरा शांत न राहता तिने त्याची वाट पाहण्याचेही बोलून दाखवले. यावरूनच करीनाच्या लाडक्या तैमूरचे स्टारडम किती मोठे आहे,हे सांगण्याची गरज नाही. नॉरचे आताच गुरु रंधावासोबतचे “नाच मेरी राणी ” हे गाणे रिलीज झाले आहे. ज्याला ३०० मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here