Home क्राइम जिथे महिलांना जिवंत जाळले जाते ,असा आज मध्ययुगीन काळ आहे का ?-कंगना...

जिथे महिलांना जिवंत जाळले जाते ,असा आज मध्ययुगीन काळ आहे का ?-कंगना रानौत

357
0

कंगना रानौतच नवा व्हिडीओ – देशाकडून हवय उत्तर

मुंबई : हिणवू -मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्याच्या कारणावरून कंगना आणि तिची बहीण रंगोली विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.तसेच शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोपही कंगनावर आहे.यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना वांद्रे पोलिस ठाण्यात या दोघीना 8 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले.यासाठीच कंगनाने वांद्रे येथील पोलीस चौकीत हजेरी लावली . कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने तिच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

वांद्रे येथे हजेरी लावून तिने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती न्यायालयाला आणि देशाला उत्तर मागत आहे.’जेव्हापासून मी देशहितासाठी बोलते तेव्हापासून माझ्यावर अत्याचार होत आहेत. शोषण केले जात आहे. हा संपूर्ण देश पहात आहे. माझे घर बेकायदेशीरपणे मोडले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलायचे तर दररोज किती खटले दाखल होत आहेत. हसण्यासाठीही एक प्रकरण समोर आले आहे. कोरोना दरम्यान, माझी बहिणी रांगोलीवर डॉक्टरांच्या हितासाठी बोलल्याबद्दल खटला चालला होता.त्या प्रकरणात माझे नावही ठेवले होते. त्यावेळी मी ट्विटही केले नव्हते . ते प्रकरणही सरन्यायाधीशांनी फेटाळून लावले. सरन्यायाधीश म्हणाले की या प्रकरणात काही अर्थ नाही. ‘

‘मला सांगण्यात आले की तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावावी लागेल. का ,ते सांगायला कोणी तयार नाही. मला सुप्रीम कोर्टाला हे विचारायचे आहे की हे मध्ययुगीन काळ आहे का ,जिथे महिला जिवंत जाळल्या जातात.” असे ती या व्हिडिओमध्ये म्हटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here