Home औरंगाबाद साखर कारखान्यातील अफरातफरी, आमदार प्रशांत बंबवर गुन्हा दाखल

साखर कारखान्यातील अफरातफरी, आमदार प्रशांत बंबवर गुन्हा दाखल

726
0

औरंगाबाद: भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्यासह आणखी सोळा जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी प्रशांत बंब यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आमदार प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

१५ कोटी ७५ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप:
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रं तयार करून सभासदांची फसवणूक करत १५ कोटी ७५ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे.

कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी केले होते पैसे जमा:
दरम्यान, गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम १५ कोटी ७५ लाख इतकी होती. मात्र, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी म्हंटल आहे. यामुळे कारखान्यातील सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला.
सभासदांनी डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी कारखान्याच्या सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले होते. मात्र. खात्यावर पैसे आल्यानंतर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात १४ सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.

प्रशांब बंब यांचीही चौकशी होणार :
दरम्यान प्रश्नात बंब या कारखान्याचे अध्यक्ष असल्यामुळे आता प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून प्रशांब बंब यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर कायदेशीर कारवाई करू असंही सभासदांकडून सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here