Home इतर ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकमध्ये !

९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकमध्ये !

209
0

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.यासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत ९४व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली.

गेल्या वर्षीचचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे पार पडले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here