Home क्रीडा ख्रिस्तियानो रोनाल्डो नाम तो सुना होगा….!

ख्रिस्तियानो रोनाल्डो नाम तो सुना होगा….!

240
0

पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या खेळाच्या जोरावर त्याने आयुष्य बदलून टाकले.
ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल जगतातील खूप मोठे नाव आहे. करोडो फुटबॉल चाहत्यांचा मनात आपले स्थान निर्माण केलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो आज म्हणजेच फुटबॉल नाही तर प्रत्येक नागरिक त्याच्याकडून प्रेरणा घेतो.रोनाल्डोचे संपूर्ण आयुष्य हे कितीही अडचणी किती हि वाद विवाद मध्ये आले तरी त्याला फुटबॉलपासून आणि फुटबॉलला त्याच्यापासून कोणीही वेगळे करू शकले नाही. रोनाल्डोची जीवनकहाणी तशी ऍक्शन, ड्रामा आणि भाविनकतेने भरलेली आहे.

रोनाल्डोचे वडील एक माळी होते, आई इतरांच्या घरी जाऊन स्वयंपाक करत असे. चार भावंडांपैकी सर्वात लहान असलेला रोनाल्डो आणि त्याचे कुटुंब टिनचे छत असलेल्या घरात राहत होते. रोनाल्डो जेव्हा गर्भात होता तेव्हा त्याच्या आईला गरिबीमुळे आण मुले नको होती. पण डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला आणि त्यानंतर रोनाल्डो या जगात आला, रोनाल्डोचा जन्म एका गरीब कुटुंबातीलच होता. जेव्हा तो अकॅडेमीमध्ये ट्रेनिंग घेत असे तेव्हा आपल्याला खाण्यासाठी साधा बर्गर घेईल इतके पैसेही नसतं.

रोनाल्डोने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, तो रोज रात्री मॅकडोनाल्डमध्ये जायचा, तिथे काम करणाऱ्या मुली त्याला दिवसभराचे उरलेले बर्गर खायला देत असत. रोनाल्डो खूप वेगाने धावत असे त्यामुळे त्याने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. रोनाल्डोला अभ्यासापेक्षा फुटबॉल खेळण्यात जास्त रस होता. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्याने स्थानिक संघासाठी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची जागतिक अंडर-17 संघात निवड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here