Home औरंगाबाद बसच्या धडकेत एक ठार,एक जखमी…!

बसच्या धडकेत एक ठार,एक जखमी…!

846
0

मराठवाडा साथी न्यूज

सिडको सिग्नलवर झाला दुपारी बाराला अपघात

औरंगाबाद : सिडको बसस्थानकासमोरील सिग्नलवर मंग‌ळवारी (दि.२२) दुपारी जालन्याहून औरंगाबादकडे भरधाव वेगात येणाऱ्या बसने सिग्नलवर उभ्या असणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील एक जण जागिच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवासीही जखमी झाले. या सगळ्यांवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि.२२)१२ वाजेच्या दरम्यान जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या वाहनांना थांबण्यासाठीचा ‘रेड सिग्नल’ लागला होता. त्यामुळे परळीहून दुचाकीवर येणारा शुभम शिंदे हा एकासोबत आपल्या दुचाकीवर (एमएच 44 व्ही 4412) एका बसच्यामागे उभा होता. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या औरंगाबाद- जालना ( एमएच 20 बीएल 2909) विनावाहक बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील दोघेही बसच्या खाली आले. यात शुभम गंभीर जखमी झाला तर त्याचा मित्र जागीच ठार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त दीपक गिर्हे, पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, पोलिस उपनिरीक्षक एम. पी. लाड, पोलिस उपनिरीक्षक कैलास अन्नदाते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविले. त्यानंतर रस्त्याची एकबाजू बंद करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, सिडको बसस्थानकाच्या समोरील सिग्नलवर एसटीच्या गाड्यांना रोज लहान-मोठे अपघात होत असतात. आजही मोठा अपघात झाल्याने तिथेली संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केली. जखमी शुभम शिंदे आणि बसमधील चार ते पाच जखमी प्रवाश्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here