Home Uncategorized वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध; रेवलीत होणार एका जागेसाठी निवडणूक!

वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध; रेवलीत होणार एका जागेसाठी निवडणूक!

1061
0

ग्रामपंचायत निवडणूक – 163 पैकी 49 अर्ज मागे

परळी : राज्यातील ३४ जिल्ह्यांत असणाऱ्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू आहे. परळी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम होत आहे. यापैकी वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होत असून रेवली ग्रामपंचायतच्या फक्त ऐका जागेसाठी निवडणूक होणार आहे. सोमवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 163 पैकी 49 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.
परळी तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, वंजारवाडी, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या सात ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, ज्याची मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत 11 जागांसा 25 उमेदवार (25 माघार) , गडदेवाडी 7 जागांसाठी 15 उमेदवार (13 माघार), सरफराजपूर 7 जागांसाठी 14 उमेदवार (0 माघार), रेवली 9 पैकी 8 जागा बिनविरोध होत असून एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत, भोपला 7 जागांसाठी 14 उमेदवार (11 माघार), वंजारवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे तर लाडझरीत 03 अर्ज काढून घेण्यात आले असून, 9 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.  07 ग्रामपंचायतच्या एकूण 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. थेट जनतेतून सरपंच निवड होणार नसल्यामुळे सदस्यांमधूनच निवडूण येण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाचे घोषीत केलेले आरक्षण रद्द केले असून, निवडणूकीच्या नंतर आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here