Home इतर SBI ग्राहकांसाठी बँकेकडून ‘अलर्ट’…!

SBI ग्राहकांसाठी बँकेकडून ‘अलर्ट’…!

951
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ४२ कोटी ग्राहकांना अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. एसबीआयने केवायसी पडताळणीसाठी येणाऱ्या बनावट कॉल किंवा मॅसेज संबंधी ग्राहकांना अलर्ट केले आहे. एसबीआयने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की,’केवायसी पडताळणीतील येणारे कॉल्स किंवा मेसेजपासून सावध रहा.’दरम्यान,एसबीआयने सुरक्षा सूचनांसाठी एक व्हिडिओ जारी केला आहे आणि अशा घटनांचा अहवाल https://cybercrime.gov.in वर पावण्यास सांगितले आहे.

फसवणूक झाल्यावर काय करावे

फसवणूक झाल्यावर ग्राहकांनी काय करावे याबद्दल एसबीआयकडून माहिती देण्यात आली आहे. जर आपल्या बँक खात्यात एखादा अनधिकृत व्यवहार झाला तर ताबडतोब टोल फ्री ग्राहक सेवा क्रमांक – 18004253800 आणि 1800112211 यावर त्याची नोंद करावी.तसेच, https://cybercrime.gov.in वर सायबर क्राइम नोंदवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here