Home देश-विदेश ट्रम्प यांचा अजबच दावा – म्हणे मुलगा फक्त १५ मिनिटांत करोनामुक्त झाला

ट्रम्प यांचा अजबच दावा – म्हणे मुलगा फक्त १५ मिनिटांत करोनामुक्त झाला

7
0


.

पेन्सिलविया: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही उमेदवार जोरदार प्रयत्न करत आहेत. पेन्सिलवियामध्ये झालेल्या प्रचार सभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब दावा केला. माझा मुलगा बॅरोन हा अवघ्या १५ मिनिटात करोनामुक्त झाला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्टिन्सबर्गमध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी ट्रम्प यांनी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा बॅरोन यांना झालेल्या करोनाच्या संसर्गाची माहिती दिली. ट्रम्प यांनी बॅरोनच्या शरीरात असलेल्या रोगप्रतिकार शक्तीकडे इशारा करताना म्हटले की, बॅरोनची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांसोबत झालेली चर्चा त्यांनी प्रचार सभेत सांगितली. बॅरोनला करोनाची बाधा झाली असल्याचे चाचणीत समोर आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, १५ मिनिटानंतर डॉक्टरांनी त्याचा करोना गेला असल्याचे सांगितले

दाव्यामागील हेतू काय?
ट्रम्प यांनी या प्रचार सभेत शाळा सुरू करण्यासाठीच्या बाजूने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा किस्सा सांगितला. अमेरिकेतील अनेक राज्य ट्रम्प यांच्या या निर्णयाशी सहमत नाही. अनेक राज्यांनी करोना आणि मुलांच्या आरोग्याच्या मुद्यावर शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे. मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे. शाळा सुरू केली तरी मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार नसल्याचे लोकांच्या मनावर ठासवण्यासाठी ट्रम्प हे उदाहरण देत आहेत.

संशोधकांचा ‘हा’ मोठा दावा :

अमेरिकेतील अकॅडमि ऑफ पीडियाट्रिक्सने सांगितले की, अमेरिकेत सात लाख ९२ हजार मुलांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेतील एकूण करोनाबाधितांपैकी ११ टक्के करोनाबाधित हे लहान मुले असल्याचेही या सर्वेक्षणात समोर आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here