Home भारतीय रेल्वे रेल्वेने प्रवास करताय? मग TTE आणि TC मधला फरक माहिती आहे का?

रेल्वेने प्रवास करताय? मग TTE आणि TC मधला फरक माहिती आहे का?

208
0

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. प्रवाशांसाठी हे विश्वासाचे आणि सोप्पे प्रवास माध्यम आहे. त्यामुळे लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. पण रेल्वेतील काही महत्वाच्या गोष्टी आजही प्रवाशांना माहिती नाही. तुम्ही जेव्हा कधी रेल्वे प्रवास करता तेव्हा तुमच्याकडे एक रेल्वे कर्मचारी येतो आणि तिकीट मागतो आणि ओळखपत्र वैगरे तपासतो. या रेल्वे कर्मचाऱ्याला कोणी टीटी, कोणी टीटीई, तर कोणी टीसी म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहित आहे का, यातील टीटीई आणि टीसी ही दोन वेगवेगळी पदं आहेत आणि त्यांचे कामही वेगळे आहे. यामुळे टीटीई आणि टीसीमध्ये नेमका काय फरक आहे जाणून घेऊ…

टीटीई म्हणजे काय?
प्रवासादरम्यान एक रेल्वे कर्मचारी रेल्वेमध्ये चढतो आणि तिकीट तपासतो, तर अनेक वेळा प्लॅटफॉर्मवरही तो तिकीट तपासतो त्यांना टीटीई म्हणतात. तिकीट तपासणे, आयडी पाहणे, प्रवासी योग्य ठिकाणी बसले आहेत की नाही, प्रवाशांना योग्य जागा मिळाली की नाही, प्रवाशांना काही अडचण आहे की नाही हे पाहण्याचे काम टीटीईचं असतं . टीटीईचा फूलफॉर्म ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असा आहे.

टीसी म्हणजे काय?
टीसी आणि टीटीईचे काम जवळपास सारखेचं असते. फरक फक्त हा आहे की, टीसी रेल्वेच्या आत जाऊन तिकीट चेक करत नाही. त्यांची ड्युटी फक्त रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासण्याचे असते. वेगवेगळ्या स्थानकांदरम्यान आणि प्लॅटफॉर्मची तिकीटे तपासण्याचे काम ते करतात. म्हणजेच टीसी स्टेशनवर उभे राहूनचं फक्त तिकीट तपासण्याचे काम करतात. या दोघांची नियुक्त रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून केली जाते आणि दोघेही याच विभागाचे कर्मचारी असतात.

जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला रेल्वेमध्ये ड्युटी लावली जाते तेव्हा त्याला टीटीई म्हणतात, तर जेव्हा त्या कर्मचाऱ्याला फ्लॅटफॉर्मवर तिकीट तपासण्यास सांगितले जाते तेव्हा त्याला टीसी म्हणतात. शिफ्टच्या आधारे कोण टीसी आणि कोण टीटीई हे ठरते. कर्मचारी तोच फक्त कर्तव्यानुसार त्याचे काम बदलते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here