Home राजकीय आदित्य ठाकरे ठरले यंग ग्लोबल लीडर्स

आदित्य ठाकरे ठरले यंग ग्लोबल लीडर्स

221
0

ठाकरे गटाकडून आनंद व्यक्त केला जात कारण.माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे यंग ग्लोबल लीडर्स ठरले आहेत. द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या यादीत आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. आदित्य ठाकरे यांची थेट जगानेच दखल घेतल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य आहे हे मी आधीच सांगत होतो. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊत मीडियाशी संवाद साधत होते
आदित्य ठाकरे यांचा या यादीत समावेश होणं हा महाराष्ट्राचा गौरव आहेच. पण देशाचाही गौरव आहे. काल देशात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे देशाला ऑस्कर मिळालं. तसेच काल जगातील शक्तीशाली तरुण नेतृत्वात आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला. मंत्री म्हणून आणि राजकीय नेता म्हणून आदित्य ठाकरे यांनी ठसा उमटवला आहे. जागतिक पातळीवरून आदित्य ठाकरे यांच्या कार्याला दिलेली ही मान्यता आहे. आम्ही आनंदीत आहोत. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचं आणि राज्याचं भवितव्य आहेत, हे मी वारंवार सांगतो होतो. त्यावरच आता शिक्कामोर्तब झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here