Home औरंगाबाद औरंगाबाद पदवीधर मतमोजणी : पहिली फेरी सुरू: सतीश चव्हाण आघाडीवर

औरंगाबाद पदवीधर मतमोजणी : पहिली फेरी सुरू: सतीश चव्हाण आघाडीवर

957
0

मराठवाडा साथी न्यूज
मतदारसंघ निवडणूक मतमोजणीला चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कलाग्राम येथे गुरुवारी सकाळी ८ वाजे पासून सुरू झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण, अपक्ष उमेदवार रमेश पोकळे, भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे, प्रहारचे उमेदवार सचिन ढवळे, यांच्यासह ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या फेरीमध्ये सतीश चव्हाण हे आघाडीवर आहेत. 1248 एकूण पोस्टल मतदानापैकी 175 मते अवैध ठरली असून 1073 मते वैध ठरली आहेत. अवैध ठरलेल्या मतांमध्ये मराठा आरक्षण बाबत मतापत्रिकेवर लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत 56 टेबलावर मतमोजणी सुरू आहे.

पहिली फेरी पूर्ण झाली नसल्याने अधिकृत आकडेवारी आली नाही. आतून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 4 हजारच्या आसपास सतीश चव्हाण यांची आघाडी आहे तर अपक्ष उमेदवार रमेश पोकळे हे दुसऱ्या क्रमांकावर असून सिद्धेश्वर मुंडे आणि बोराळकर हे तीन क्रमांकावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here